महाराष्ट्र

सरकार बदललं पण मुंढेंच्या बदल्या थांबेनात

आपल्या धडाकेबाज प्रशासकीय कार्यशैलीने ओळखले जाणारे  प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांची नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदावरून तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. या बदलीमुळे सरकार बदललं पण मुंढेंच्या बदल्या थांबेनात अशी चर्चा सुरू झाली आहे.

तुकाराम मुंढे यांची आता सदस्य सचिव महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मुंबई येथे बदली करण्यात आली आहे.  त्यांच्या जागी नागपूरच्या महापालिका आयुक्त राधाकृष्ण बी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांच्या बदलीचे आदेश आज देण्यात आले.

नागपूर महापालिकेतील काही राजकीय नेते व आयुक्त मुंढे यांच्यातील वाद चांगलाच रंगला होता. हेच वाद त्यांना भोवले असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. तुकाराम मुंढे सध्या कोरोना बाधित असल्याने गृह विलगीकरणात आहेत. त्यामुळे  ते आपला नवीन पदभार कधी स्वीकारणार याबाबत उत्सुकता आहे.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये