
कोथरुड : डहाणूकर कॉलनीतील आकार मित्र मंडळाच्या गणरायाचे सातव्या दिवशी विसर्जन करण्यात आले. महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत कार्यकर्त्यांनी मंडळा जवळच श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करत आपल्या लाडक्या बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर या म्हणत निरोप दिला. कोरोना च्या पार्श्वभूमीवर मंडळाने यावर्षी अत्यंत साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला. दरवर्षी मंडळ गणेशोत्सव काळात विविध सामाजिक उपक्रम राबवत असते. तसेच सातव्या दिवशी पारंपारिक पद्धतीने ढोल-ताशांच्या गजरात गणरायाला निरोप देण्यात येतो असे मंडळाचे उत्सव प्रमुख सचिन फोलाने यांनी सांगितले. जगावरील, देशावरील कोरोना चे संकट लवकर दूर होऊ दे असं मागणं कार्यकर्त्यांनी गणरायाकडे मागितले. यावेळी अध्यक्ष प्रकाश बारड, उत्सव प्रमुख सचिन फोलाने, शशिकांत पोहरकर, सौरभ अथणीकर , राजू गोखले, कुणाल धावरे, सतीश दांडेकर आदी कार्यकर्ते उपस्थीत होते.



