राष्ट्रीय

गुजरातमध्ये भाजपची सत्ता

अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपनं १५६ जागांवर विजय मिळवला. काँग्रेसला १७ जागांवर, आम आदमी पार्टीला ५ आणि अपक्षांना चार जागांवर विजय मिळाला. भाजपनं गुजरातमध्ये सातव्यांदा सत्ता स्थापन केली आहे. गुजरातमध्ये भाजपनं आतापर्यंतच्या सर्वाधिका जागा मिळवल्या आहेत. दुसरीकडे काँग्रेसची गुजरातमधील कामगिरी निराशाजनक ठरली आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी घटलोडियामधून भूपेंद्र पटेल विजय मिळवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपचे गुजरातमधील प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांचं या यशाबद्दल अभिनंदन केलं आहे. गुजरातचा निकाल अपेक्षित असून आम आदमी पक्ष आणि भाजपचं साटंलोटं असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आपने दिल्ली घेतली आणि गुजरात भाजपासाठी सोडलं असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

गुजरातमधील निकाल धक्कादायक असल्याचं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जगदीश ठाकूर यांनी केलं आहे. “गुजरातमध्ये पुन्हा भाजप सरकारला आणण्याचा जनतेचा निर्णय धक्कादायक आहे. निकाल पाहता आम्ही कोणत्याही बाजूने कमी पडलेलो नाही,” असं जगदीश ठाकूर म्हणाले आहेत.

“आम्ही चांगला लढा दिला आहे. पण तरीही आम्ही सरकार स्थापन करु शकलेलो नाही,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली. पराभवाचं कारण विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की “यावर आम्ही चर्चा करु. विजय किंवा पराभवाची एक, दोन कारणं नाही आहेत. तसंच भाजपसंबंधी प्रेम आहे असंही नाही”.

Fb img 16474137314577667123777135621121

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये