ऑल इज वेल : तुकाराम मुंढे

२४ ऑगस्ट रोजी प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांची कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह आली होती. लक्षणे नसल्यामुळे मात्र पॉझिटिव्ह आल्याने शासनाच्या गाईडलाईन्सनुसार त्यांनी स्वतःला गृह विलगीकरणात ठेवले आहे. या काळात आपण घेत असलेल्या काळजी बाबत त्यांनी फेसबुक पेजवर ऑल इज वेल म्हणत माहिती दिली आहे.
मुंढे यांनी म्हंटले आहे की, गृह विलगीकरणाचे सर्व नियम मी पाळत आहे. मास्क लावणे, कुटुंबातील कुठलाही सदस्य मी असलेल्या खोलीत न येणे, व्हिटॅमिन सी, बी कॉम्प्लेक्स आणि झिंक गोळ्यांचे सेवन करणे, थर्मल स्कॅनिंग द्वारे ठराविक काळानंतर शरीराचे तापमान तपासणे आदी सर्व दिशानिर्देशांचे पालन करीत आहे.
ज्यांना-ज्यांना लक्षणे नाहीत मात्र ते पॉझिटिव्ह आले आहेत, अशा सर्वांनी गृह विलगीकरणाच्या दिशानिर्देशांचे पालन करावे. आपणापासून इतरांना संक्रमण होणार नाही, याची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.



