पुण्यात धक्कादायक प्रकार : एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या

पुणे : एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या
केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. शुक्रवारी रात्री हा प्रकार उघडकीस आला. पती पत्नी आणि दोन मुलं यांनी विष पिऊन आत्महत्या केली आहे. आर्थिक विषयातून हा प्रकार घडला असल्याचे बोलले जात आहे.
पोलिसांनी घटना स्थळी दाखल होत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू केला आहे. दीपक थोटे (वय 59 ), इंदू दीपक थोटे (वय 45), मुलगा ऋषिकेश दीपक थोटे (वय 24) आणि मुलगी समीक्षा दीपक थोटे (वय 17) अशी आत्महत्या केलेल्या चौघांची नावे आहेत. पुण्यातील मुंढवा परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला असून त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
दोन महिन्यापूर्वी हे कुटुंब मुंढवा येथील केशवनगर परिसरात वास्तव्यास आले होते. त्यापूर्वी हे कुटुंब अमरावतीत राहत होतं. शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवल्यानंतर त्यात झालेल्या आर्थिक नुकसानीमुळे या कुटुंबाने आत्महत्या केल्याचं सांगितलं जातं आहे.




