कोथरूडमध्ये रस्त्यावर थुंकणाऱ्यांकडूनच धुवून घेतले रस्ते

थुंकी सम्राटांवर दंडात्मक कारवाई
कोथरूड : कोथरूड परिसरात रस्त्यावर थुंकणाऱ्या थुंकी सम्राटांवर कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात आली. रस्त्यावर थुंकणाऱ्या व सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरवणाऱ्या नाकरिकांकडून चांगला दंड वसूल करण्यात आला.
पान टपरी, स्नॅक सेंटर, वरदळीचे ठिकाणे इत्यादी परिसरामध्ये पान गुटखा तंबाखू खाणाऱ्या थुकी सम्राटांवर जबरदस्त दंडात्मक कारवाई करण्यात आली. सदर कारवाईमध्ये थुंकी सम्राटांवर हातामध्ये झाडू पोछा व पाणी यांच्या साह्याने सार्वजनिक रस्त्यावर थुंकलेले थुंकी साफ करून घेण्याची सक्ती करण्यात आली. शिवाय त्यांना प्रत्येक पान टपरीवर थुंकीसाठी स्वतंत्र थुंकीपात्र ठेवण्यास भाग पाडण्यात आले. सार्वजनिक फुटपाथ वर , रस्त्याचे डिव्हायडर झाडाच्या बुंध्यामध्ये, भूयारी मार्ग, पी एम पी एम एल बस थांबे, सर्व सरकारी इमारती, सार्वजनिक शौचालय इत्यादी ठिकाणी थुंकून शहर घाण करणाऱ्या ११ नागरिकांवर, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणार्या १६ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून एकूण २७ हजार ७५० रुपये शुल्क वसूल करण्यात आले.










स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ सर्वेक्षण तसेच जी – २० शिखर परिषदे” अन्वये कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय पुणे महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने प्रभाग क्रमांक १२, कोथरूड गावठाण परिसर, डहाणूकर कॉलनी, गोपीनाथ नगर, एकलव्य कॉलेज, बावधन बुद्रुक, पाटील नगर, ओंकार गार्डन, सूर्यदत्ता कॉलेज, अरिहंत कॉलेज, गुरुगणेशनगर इत्यादी परिसरामध्ये ही दंडात्मक कारवाई करण्यात आली.
सदर कारवाई उपायुक्त नितीन उदास व सहाय्यक महापालिका आयुक्त केदार वझे यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य निरीक्षक करण कुंभार, सचिन लोहकरे, हनुमंत चाकणकर मुकादम वैजीनाथ गायकवाड, अण्णा ढावरे, राम गायकवाड, अर्जून साठे या पथकाने केली.


