विठ्ठल रुक्मिणी मंडळाच्या गणेशाचे साध्या पद्धतीने विसर्जन

कर्वेनगर : भालेकरनगर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी सार्वजनिक मंडळाच्या गणेशाचे विसर्जन शासकीय नियमांचे पालन करत मंदिरा समोरच कृत्रिम हौदामध्ये करण्यात आले.
यावेळी उत्सव प्रमुख चेतन भालेकर, राजेंद्र भालेकर, मंगेश जगताप, भगवान चव्हाण, उमेश भालेकर, रामचंद्र वालगुडे, गुलाब भुजबळ, सूर्यकांत शिंदे, बाळासाहेब भालेकर, किरण तांबट, राहुल भालेकर, महेश धुमाळ, बाळासाहेब बड़दे, उत्कर्ष दिघे, रोहित चव्हाण, सचिन मोहोळ उपस्थित होते.
वारकरी परंपरा जोपासणारे मंडळ म्हणून या मंडळाची ओळख आहे. दरवर्षी गणेशाच्या स्थापनेची व विसर्जनाची मिरवणूक वारकरी सांप्रदायातील लोकांच्या सहभागातूनच काढली जाते. मंडळाचे उत्सव प्रमुख चेतन भालेकर यांनी सांगितले की, कोरोना पार्श्वभूमीवर मंडळाने यावर्षी अतिशय साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला. मंडळाच्या वतीने या उत्सवाच्या काळात नागरिकांना मास्क वाटप करण्यात आले. वर्षभर मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.



