कोथरुड

स्व.शरदआप्पा बालवडकर यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिर

बालेवाडी : येथील लक्ष्मी माता मित्र मंडळाच्या वतीने
स्व.शरदआप्पा महादू बालवडकर यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व राक्त पेढीतील रक्ताची भासणारी कमतरता या सर्व गोष्टीचा विचार करून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मंडळाकडून सलग ९ वर्षे या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही रक्तदात्यांचा चांगला सहभाग मिळाला.

यावेळी  प्रकाश  बालवडकर, केशव बालवडकर, सुनिल दगडे, संतोष बालवडकर, विनायक बालवडकर, युवराज बालवडकर, विक्रम बालवडकर अक्षय बालवडकर, नरेंद्र बालवडकर, रवींद्र बालवडकर दिपक बालवडकर, पिंपरी सिरॉलॉजिकल इन्स्टिट्यूट ऑफ ब्लड बँक यांच्या सहकार्याने हे शिबिर घेण्यात आले.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये