पुणे शहर

आमदार सुनील टिंगरे यांना कोरोनाची लागण

पुणे : वडगावशेरी मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांना कोरोना ची लागण झाली आहे. त्यांनी ही माहिती ट्विटर द्वारे दिली आहे. त्यांना कोरोना संदर्भातील प्राथमिक लक्षणे दिसून आल्याने त्यांनी तपासणी करून घेतली. चाचणी पॉझिटिव्ह आल्याने  खबरदारी म्हणून टिंगरे रुग्णालयात दाखल झाले आहेत. माझी लक्षणे सौम्य आहेत परंतु मागील काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी खबरदारी म्हणून सावधगिरी बाळगावी असे त्यांनी म्हंटले आहे.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये