कोथरुड

नगरसेविका हर्षाली माथवड यांच्या कडून कोथरूडमध्ये सहा हजार दिवाळी फराळाच्या किटचे वाटप

पुणे : कोथरूड येथील नगरसेविका हर्षाली माथवड यांच्या वतीने दिवाळीनिमित्त गुजराथ कॉलनी, लक्ष्मी नगर, कोथरूड गावठाण आणि शेलार वस्ती  या परिसरातील नागरिकांसाठी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे सहा हजार दिवाळी फराळाच्या किटचे वाटप करण्यात आले.

“गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे दिवाळीचा सण आनंदाने साजरा करू शकलो नाही. मात्र या वर्षी कोरोना संदर्भातील सर्व नियमांचे पालन करून दिवाळीचा हा सण मोठ्या आनंदात साजरा करणार आहोत. हे आनंद पर्व समाजातील शेवटच्या घटकापर्यन्त हा आनंद पोहोचवण्यासाठी या ‘फराळ वाटप’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे” असे नगरसेविका हर्षाली दिनेश माथवड यांनी सांगितले. 

या कार्यक्रमाचे उदघाटन महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला शहराध्यक्ष जगदीश मुळीक , राजेश पांडे , नगरसेवक किरण दगडे , वासंती जाधव , पुनीत जोशी, बाळा टेमकर , कांचन कुंबरे , हर्षदा फरांदे , दुष्यन्त मोहोळ , बाळासाहेब विचारे , वैभव मुरकुटे , अमित तोरडमल बाळू दांडेकर , सुनिल गेहलोत , अनिता तलाठी , विद्या टेमकर , सुरेखा जगताप , पूजा पाठक , कैलास मोहोळ , आदी मान्यवर उपस्थित होते.

Screenshot 2021 10 26 15 21 45 02

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये