पुणे शहर

विद्यापीठ चौक वाहतूक बदलातील उणीवा दूर करू- आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : विद्यापीठ चौकातील नवीन वाहतूक पॅटर्न मधील काही उणीवा आढळल्यास त्या वाहन चालक आणि रहिवासी यांच्याकडून माहिती घेऊन दूर केल्या जातील, असे आश्वासन आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (सोमवारी) दिले.

पोलीस उपआयुक्त (वाहतूक) विजयकुमार मगर व पुणे शहर वाहतूक शाखेचे अधिकारी यांच्यासमवेत आमदार शिरोळे यांनी पुणे विद्यापीठ रस्त्याच्या नवीन वाहतूक पॅटर्नची पाहणी केली. नवीन पॅटर्नमध्ये काही उणीवा असल्या तरी, वाहन चालक आणि रहिवाशांकडून याबाबत माहिती घेऊन त्या दूर केल्या जाऊ शकतील, असे आमदार शिरोळे यांनी पाहणीनंतर सांगितले.

उड्डाणपुलाच्या आगामी बांधकाम टप्प्यामुळे होणारी गैरसोय आणि गर्दीच्या वेळी होणारी कोंडी कमी करण्यासाठी पुणे शहर वाहतूक पोलीस प्रयत्नशील आहेत, असाही विश्वास आमदार शिरोळे यांनी व्यक्त केला.

Img 20221228 wa000128129390617609791042356

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये