पुणे शहर

महापालिका निवडणुक ऑक्‍टोबरमध्ये ?

पुणे : पुढे ढकललेल्या महापालिका निवडणुका कधी होणार याची चर्चा कायम सुरू असते. मध्यंतरी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 9 मे पुर्वी न्यायालयाने निकाल दिला तरच ऑक्‍टोबरमध्ये निवडणुक होण्याची शक्‍यता व्यक्त केली होती. त्यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील अशी शक्यता व्यक्त केली आहे. पुण्यात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली भाजपची महाबैठक पार पडली आहे. या बैठकीत पुण्यातील भाजपचे सर्वच पदाधिकारी उपस्थित होते. या पदाधिकाऱ्यांना बावनकुळे यांनी महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत.

राज्यातील महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात होणार आहेत. स्वतः देवेंद्र फडणवीस पुण्यात जातीने लक्ष घालणार आहेत. त्यामुळे पुणे महापालिकेत 100 पेक्षा अधिक नगरसेवक निवडणून आणण्याचे लक्ष ठेवण्याचे आदेश चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. तर पक्षाची संघटनात्मक ताकद कशी वाढेल यावर प्रत्येक कार्यकर्त्याने लक्ष देण्याच्या सूचना देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी या बैठकीत दिल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

राज्यातील अनेक महानगरपालिकांची मुदत संपून वर्षभरापेक्षा अधिक काळ लोटला आहे. त्यात पुणे महापालिकेवर देखील वर्षभरापेक्षा अधिक काळापासून प्रशासकराज आहे. महापालिकेच्या निवडणुका नक्की कधी होणार ? याची प्रतीक्षा सर्वपक्षीय इच्छुकांना तसेच पुणेकरांना देखील आहे. 

Img 20221126 wa02126927299965323449855 1

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये