राजकीय

रावसाहेब दानवे यांची अजित पवारांना मोठी ऑफर…

काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र लढले. तेव्हा काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीला जास्त जागा मिळाल्या होत्या. त्याहीवेळी अजित पवार यांना मुख्यमंत्री होता आलं नाही. राजकारणातील या घटना आहेत. त्याच मी तुम्हाला सांगत आहे. दावा करणं वेगळी गोष्ट आहे. बहुमत असणं वेगळी गोष्ट आहे. जर बहुमताच्या बाजूने ते आले किंवा कदाचित 10-20 वर्षानं त्यांना बहुमत मिळालं तर ते मुख्यमंत्री होऊ शकतात, असं सूचक विधान करतानाच रावसाहेब दानवे यांनी अजित पवार यांना थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफरच दिली. त्यामुळे तर्कवितर्क लढवल्या जात आहेत.केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे मीडियाशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी हे विधान केलं.

माझा अजित पवार विरोध नाही. चांगले कार्यकर्ते आहेत. धडाडीचे कार्यकर्ते आहेत. ते जे काही विधान करत आहेत. त्याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे, असंही रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. रावसाहेब दानवे हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. दिल्लीत आणि राज्यात त्यांच्या शब्दाला वजन आहे. त्यामुळे त्यांनी अजित पवार यांना अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याने राज्यात सर्वकाही अलबेल नसल्याचं दिसून आलं आहे.

अजित पवार यांनी भाजपसोबत जाणार नसल्याचं आधी स्पष्ट केलं होतं. काल मात्र मलाही मुख्यमंत्री व्हायचं आहे. पण त्यासाठी 2024ची वाट का पाहायचीय? असं म्हणून सर्वांनाच बुचकळ्यात टाकलं आहे. त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्रातील राजकारणात अनेक घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Img 20221126 wa02126927299965323449855 1
Screenshot 2023 04 22 00 14 45 396564980979244510329
Screenshot 2023 04 22 00 15 01 814640390574744812414
Screenshot 2023 04 22 00 15 19 364792225750788922510
Screenshot 2023 04 22 00 15 40 526549235811919531856
Screenshot 2023 04 22 00 16 03 432680365221548073917
Screenshot 2023 04 22 00 16 18 011506406434433085249

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये