कोथरुड

कोथरूड मतदार संघातील या भागातील नागरिकांचा पाणी प्रश्न सोडवणार ; चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

पुणे : कमी दाबाने पाणीपुरवठा होत असलेल्या पाषाणमधील नागरिकांना बाणेर-बालेवाडीप्रमाणे सुरळीत पाणीपुरवठा होईल, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. थेट भेट उपक्रमाच्या माध्यमातून पाटील यांनी पाषाणमधील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी भाजपा कोथरुड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, भाजपा नेते गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, राहूल कोकाटे, सनी निम्हण, रोहन कोकाटे, औंध क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संदीप कलाटे यांच्या सह इतर अनेक मान्यवर आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Img 20220425 wa0010282295345156635031542582

यावेळी कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी, कचऱ्याची समस्या, पोलीस गस्त वाढविणे, योग अभ्यास केंद्र उपलब्ध करून देणे आदी समस्या स्थानिक नागरिकांनी चंद्रकांत पाटील यांच्या समोर मांडल्या. त्यावर संबंधित अधिकाऱ्यांना सर्व समस्या तातडीने दूर करण्याच्या सूचना दिल्या. तसेच कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर अधिक्षक अभियंता अनिरुद्ध पावसकर यांच्याशी फोनवर संपर्क साधून, पाणीपुरवठा सुरळीत करण्याची सूचना त्यांनी दिल्या.

Img 20230524 wa0032

त्यासोबतच चुकीच्या पद्धतीने वाहन चालवून वाहतूक कोंडी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश नामदार पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिले. तसेच योग अभ्यासासाठी आयुक्तांसोबत चर्चा करुन केंद्र सुरू करण्याचे निर्णय घेण्याची ग्वाही यावेळी पाटील यांनी दिली.

नामदार पाटील यांनी लोकसहभागातून स्वच्छच्या माध्यमातून कचरा संकलन सुरू केल्याबाबत सर्व नागरिकांनी समाधान व्यक्त केले. मात्र, महामार्गालगत काहीजण राडारोडा टाकून वाहतुकीस अडथळा निर्माण करत असल्याचे, नामदार पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावरही लवकरच तोडगा काढण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

Img 20230524 wa0027
Img 20230511 wa00027384472977045778543

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये