वाढदिवस निमित्त आहे, जनतेप्रती सेवा कार्य हेच आमचे कायम ध्येय : किरण बारटक्के

वारजे : पावसाळ्याच्या तोंडावर नागरिकांना पावसापासून संरक्षण होण्याकरिता माजी नगरसेवक किरण बारटक्के यांच्या वाढदिवसानिमित्त वारजे परिसरातील नागरिकांना छत्री वाटप करण्यात आले. बारटक्के यांच्या जनसंपर्क कार्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते व आमदार भीमराव तापकीर यांच्या उपस्थितीत करण्यात आली होती. छत्री वाटप कार्यक्रमास ज्येष्ठ आणि महिला वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.
किरण बारटक्के वारजे परिसरात करत असलेल्या चांगल्या कामाबाबत अनेकांनी त्यांना यावेळी उपस्थित राहत शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ महिलांनीही त्यांना यावेळी आशीर्वाद दिले. बारटक्के म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे सेवा कार्य सातत्याने सुरू आहे. आणि या सेवा कार्यामुळे जनतेचे आशीर्वाद आम्हाला लाभत आहेत. जनतेच्या अडीअडचणी सोडून त्यांना सुकर जीवन जगता यावे असा आमचा प्रयत्न आहे. वाढदिवसनिमित्त आहे जनतेप्रती सेवा कार्य हेच आमचे ध्येय आहे.













