महाराष्ट्र

महामहीमांवर दबाव होता का ?

अभिनेत्री कंगना राणावत हिने मुंबईची पाकिस्तान बरोबर तुलना केल्यानंतर तिच्यावर सर्वच स्तरातून टीका झाली. कांगना व राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची भेटही चांगलीच गाजली होती यावरून आता काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी ट्विट करत कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे.

सावंत यांनी म्हंटले आहे की, महामहीम राज्यपाल उत्तराखंडचे असले तरी आता ते सर्वस्वी महाराष्ट्राचे आहेत. तसेच ते संविधानाच्या दृष्टिने महाराष्ट्र राज्याचे प्रमुख आहेत. सर्वांनाच त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे. त्यातही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची प्रतिष्ठा रक्षणाची जबाबदारी राज्याचे प्रमुख राज्यपालांची असते.

म्हणूनच मुंबई पोलीसांना बदनाम करणाऱ्या, मुंबईला पाकिस्तान म्हणून महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करुन गलिच्छ भाषेत अपमान करणाऱ्या कंगना राणावतला त्यांनी तातडीने भेट दिली याचा खेद वाटतो.
अभिनेत्रीेत आहे. असो!

जरी महामहीमांनी तीला भेट दिली तरी ज्या त्वरेने अजोय मेहतांना बोलावणे धाडले तशीच तीची कान उघाडणी केली असती तरी महाराष्ट्राच्या जनतेला आनंद झाला असता. पण महामहीम आसनस्थ होण्याआधी बसून तीने आमच्या महाराष्ट्राच्या राज्यपालांचाही आदर राखला नाही याची खदखद आमच्या मनात व जनमानसात आहे असं सावंत यांनी म्हंटले आहे.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये