पुणे शहर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या  दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यात राजकीय हालचालींना वेग; भाजपची प्रशासनाकडे महत्त्वाची मागणी

भाजप पाधिकाऱ्यांनी घेतली पोलिस आयुक्तांची भेट

पुणे : देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह  आणि राष्ट्रीय सुरक्षा  सल्लागार अजित डोवाल  हे १ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यासाठी पुणे दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील शांतता, कायदा-सुव्यवस्था आणि सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहर पदाधिकाऱ्यांनी आज पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

Img 20260222 wa00063491038201882637992


भाजपा पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या भेटीत, दौऱ्यादरम्यान शहरात कोणत्याही प्रकारचे आंदोलन, निदर्शने किंवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा पोहोचवणारे प्रकार घडू नयेत, यासाठी प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच शहरातील शांतता भंग होईल किंवा सुरक्षेच्या दृष्टीने अडचणी निर्माण होतील, अशा कोणत्याही आंदोलनास परवानगी देऊ नये, अशी भूमिका भाजपच्या शिष्टमंडळाने मांडली.

यावेळी प्रशासनाने सर्व राजकीय पक्षांना समान न्याय देत निष्पक्ष भूमिका घ्यावी आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

या शिष्टमंडळात भाजपा सरचिटणीस व नगरसेवक रवी साळेगावकर, बापू मानकर, दीपक पोटे, विश्वास ननावरे, सुशील मेंगडे, अमर आवळे, महिला मोर्चा शहराध्यक्षा मनीषा लडकत, युवा मोर्चा अध्यक्ष दुष्यंत मोहोळ, पुष्कर तुळजापूरकर आदी उपस्थिती होते.

पुणे शहर काँग्रेसची आंदोलनाची तयारी

नीट पेपर लिक प्रकरणात दिल्ली येथे जंतर-मंतरवर झालेल्या आंदोलनात विद्यार्थी आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठी चार्जचा निषेध म्हणून १ ऑगस्ट रोजीच पुणे शहर काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरच हे आंदोलनाचे नियोजन केले जात असल्याचे दिसत आहे. विद्यार्थ्यांवरील अमानुष हल्ल्याचा निषेध होणारच.. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात आंदोलन होणारच..असा पवित्रा काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी घेतला असून त्या संदर्भातली पोस्ट देखील त्यांनी समाज माध्यमांवर प्रसारित केले आहे..

भाजप पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त यांची भेट घेऊन एक ऑगस्ट रोजी कोणत्याही प्रकारच्या आंदोलनांना परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी केली आहे तर दुसरीकडे काँग्रेसकडून आंदोलन होणारच असे बोलले जात आहे त्यामुळे पुणे पोलीस नक्की काय भूमिका घेणार याबाबत उत्सुकता लागलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये