भीमाशंकर मंदिर परीसरात संस्थानच्या वतीने मोठा निर्णय ; भाविकांना केले हे आवाहन

भीमाशंकर : बारा ज्योर्तिलिंगापैकी पुणे जिल्ह्यातील एक असलेल्या श्री क्षेत्र भिमाशंकर येथे श्रावण महिन्यात होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता श्री क्षेत्र भीमाशंकर संस्थान (ज्योर्तिलिंग) च्या वतीने मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या अधिक श्रावण महिना सुरू असल्यामुळे दर्शनासाठी भीमाशंकर मध्ये भाविकांची गर्दी होत आहे. यानंतर सुरू होणाऱ्या श्रावणात ही गर्दी आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे संस्थानने सुरक्षिततेच्या दृष्टीने गाभारा, मुख्य मंडप आणि मंदिर परीसरामध्ये गर्दी होऊन भाविकांची गैरसोय होऊ नये व दर्शन सुलभतेने व्हावे तसेच कुठलीही अनुचित घटना घडू नये आणि मंदिराचे पावित्र राखले जावे यासाठी मोबाईल वापरास व फोटोग्राफी करण्यास बंदी घातली आहे. प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात हा निर्णय घेण्यात आल्याचे सस्थांनच्या वतीने सांगण्यात आले आहे.
संस्थानच्या वतीने भाविकांना आवाहन करण्यात येआहे की , गाभारा , मुख्य मंडप आणि मंदिर परीसरात फोटोग्राफी करू नये तसेच मोबाईल बंद ठेवून सहकार्य करावे. या आवाहानानंतर ही परीसरात कोणी भाविक मोबाईल वापरताना अथवा फोटोग्राफी करताना आढळल्यास मंदिर संस्थानच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.










