पुणे शहर

कोण होणार भाजप युवा मोर्चा पुणे शहराध्यक्ष ? ही नावे आहेत चर्चेत..

अमोल साबळे

पुणे : भाजप मध्ये सध्या कार्यकारणी मध्ये बदल करून नवीन पदाधिकारी निवडीची लगबग सुरू आहे. माजी नगरसेवक धीरज घाटे यांची नुकतीच भाजप पुणे शहर अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. आता शहरातील पदाधिकारी निवडीवर नेते मंडळींनी लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे पक्षीय पदांबरोबर भाजप युवा मोर्चा पुणे शहराचा अध्यक्ष कोण होणार या कडे सर्व भाजपमधील युवा कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

नुकत्याच झालेल्या भाजप युवा मोर्चाच्या प्रदेश कार्यकारणी मध्ये पुणे शहरातील अनेक कार्यकर्त्यांना संधी मिळाली आहे. त्यामध्ये प्रदेश सरचिटणीसपदी अनुप मोरे, सुशील मेंगडे यांची तर प्रदेश उपाध्यक्षपदी कुणाल टिळक, निवेदिता एकबोटे, आमृत मारणे,अभिजित राऊत, व प्रदेश सचिव पदी सौरभ कुंडलीक, तेजस गडाळे यांची तसेच प्रदेश सदस्य पदी अनिकेत हारपुडे यांची निवड करण्यात आली. म्हणजे पुणे शहरातील नऊ जणांची युवा मोर्चाच्या प्रदेश कार्यकारणीत वर्णी लागली आहे. त्यामुळे आता पुणे शहर युवा मोर्चाचे अध्यक्ष पद कोणाकडे जाणार याबाबत भाजप राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

सध्या राघवेंद्र उर्फ बापू मानकर यांच्याकडे पुणे शहर भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष पद आहे. मानकर यांनी अनेक विषयांवर आक्रमकपणे आंदोलने करण्याबरोबरच सर्व पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन संघटना वाढीसाठी काम केले. अनेक युवक पक्षाशी जोडले, तसेच पक्षाने दिलेली जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्याचे पाहिला मिळाले. आता नवीन अध्यक्ष निवड करताना तसाच धडाडीचा, आक्रमक व युवकांना जोडणाऱ्या कार्यकर्त्याची निवड पक्षाला करावी लागणार आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या या पदासाठी दुष्यंत मोहोळ, करण मिसाळ व प्रतीक देसार्डा ही नावे चर्चेत आहेत. दुष्यंत मोहोळ यांनी युवा मोर्चाच्या कोथरूड मतदार संघ अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे तर करण मिसाळ व प्रतीक देसार्डा यांनी युवा मोर्चाचे शहर सरचिटणीस म्हणून काम पाहिले आहे. हे तीन प्रमुख इच्छुक चर्चेत असून या तींघांपैकी कोण अध्यक्ष होणार का आणखी कोणते नाव पुढे येणार हे आता पहावे लागणार आहे.

Img 20230810 wa00132822211195917373961
Img 20230803 wa00041486684870724290474
Img 20230511 wa000228129

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये