
आठ दिवसात २०० नागरिकांनी घेतली माहिती
कोथरुड : कोथरुड विधानसभा मतदार संघातील नागरिकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केलेल्या एनसीपी कोविड ब्रिगेड हेल्प डेस्क वरून सात दिवसात २०० नागरिकांनी फोन करून व प्रत्येक्ष भेट देऊन कोरोना संदर्भात त्यांना आवश्यक असणारी माहिती घेतली असल्याचे मतदार संघाचे अध्यक्ष स्वप्नील दुधाने यांनी सांगितले.
१५ दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांनी आता रस्त्यावर उतरून नागरिकांची मदत करा असे सांगताना प्रत्येक मतदार संघात कोविड हेल्प डेस्क सुरू करा अशा सूचना दिल्या होत्या. त्यानंतर कोथरुड मतदार संघासह असे हेल्प डेस्क इतर मतदार संघात ही सुरू करण्यात आले आहेत.
कोथरुड मतदार संघाचे अध्यक्ष स्वप्नील दुधाने यांच्या कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या हेल्प डेस्क चे उद्घाटन राष्ट्रवादी काँगेसचे नेते नगरसेवक, दीपक मानकर यांच्या हस्ते करण्यात होते. उद्घाटनानंतर आठ दिवसात या एनसीपी हेल्प डेस्क वरून २०० नागरिकांना कोवीड संदर्भात त्यांना आवश्यक असणारी माहिती देऊन त्यांना आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले आहे.
या डेस्क वरून COVID-19, कोरोना विषयी राज्य शासनामार्फत व महापालिकेमार्फत उपलब्ध करण्यात आलेल्या सर्व सुविधा, अत्यावश्यक संपर्क क्रमांक याची माहिती देण्यात येत आहे. एखाद्या कुटुंबात कोणाला कोरोनाची लक्षणे दिसून आली तर आता पुढे काय करायचे याबाबत घरातील सदस्यांमध्ये अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. त्यांना योग्य आवश्यक माहिती हेल्प डेस्कवरून देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात येत असल्याचे दुधाने यांनी सांगितले.

हेल्प डेस्कला पुणे शहर एनसीपी डॉ. सेलचे अध्यक्ष डॉ. सुनील जगताप, डॉ. राहुल सुर्यवंशी यांनी फेसशिल्ड दिले आहेत तर पुणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ व माजी नगरसेवक बाबा धुमाळ यांचाकडून पल्स ॲाक्सीमीटर व थर्मोमीटर देण्यात आले आहेत.



