मिठाई फरसाण अँड डेअरी असोसिएशन पुणेतर्फे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाची आरती

पुणे : मिठाई फरसाण अँड डेअरी असोसिएशन पुणे तर्फे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा ची आरती करण्यात आली या वेळी अध्यक्ष संजय चितळे कार्याध्यक्ष मुरलीधर चौधरी उपाध्यक्ष योगेश अग्रवाल, दिलीप बुधानि सचिव अमित अग्रवाल सहसचिव प्रशांत डाटा खजिनदार दिनेश अग्रवाल तसेच शांतारामतात्या अमराळे,दिलीप चोरघे, राजेंद्र निकम,सचिन मोकाटे, रविंद्र सारूक, गोपी गाताडे, कुलदीप चाहर मोहीत अग्रवाल, तुषार शर्मा , निखिल मालानि आदी सदस्य उपस्थित होते.
या वेळी चितळे बंधू यांच्या तर्फे सुवर्ण वर्ख असलेला ड्रायफुट मोदक बाप्पांना अर्पण करण्यात आला या वेळी अध्यक्ष संजय चितळे यांनी बोलताना सांगितले की महाराष्ट्रातील दुष्काळाचे सावट दूर होऊन चांगला पाऊस पडावा शेतकरी व व्यापारी यांना चांगले दिवस यावे अशी गणपती बाप्पा चरणी प्रार्थना केली आहे या आरती चे नियोजन काका हलवाई चे संचालक आणि श्रीमती लक्ष्मीबाई दगडुशेठ हलवाई दत्त मंदीर ट्रस्ट चे अध्यक्ष युवराज गाडवे यांनी केले होते.

सिंहासन News च्या बातम्या, अपडेट्स आता व्हॉट्सअप चॅनलवर. आजच फॉलो करा.खालील लिंकवर क्लिक करा आणि चॅनलला फॉलो करुन अपडेटस् मिळवा…
Follow the सिंहासन News sinhasannews channel on WhatsApp https://whatsapp.com/channel/0029Va9p6qIBlHpiiqL83N0C


















