कोथरूडमधील शास्त्रीनगर येथील संगम तरुण मंडळ ट्रस्टचा यंदा ‘श्री शिवराज्याभिषेक सोहळा ‘ सजीव देखावा; देखावा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

पुणे : कोथरूडमधील शास्त्रीनगर येथील संगम तरुण मंडळ ट्रस्टने यंदाच्या वर्षी छत्रपतींच्या शिवराज्याभिषेक दिनाला ३५० वर्ष पूर्ण झाली असून त्यानिमित्ताने ‘श्री शिवराज्याभिषेक सोहळा ‘ या सजीव देखाव्याचे सादरीकरण केले आहे.
संगम तरुण मंडळ ट्रस्ट,कोथरुड यंदा ५७ व्या वर्षात यशस्वी पदार्पण करत आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या परंपरेचा पाया रचला होता. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून जनजागृती करुन समाजप्रबोधन करणे हा त्यांचा मुख्य उद्देश होता. लोकमान्य टिळकांचा उद्देश सफल करता यावा या हेतूने प्रेरित होऊन संगम तरुण मंडळ ट्रस्ट आपली आजवरची वाटचाल करीत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे जगातील आदर्श नेतृत्व होते. त्यांनी रयतेच्या हितासाठी लोककल्याणकारी स्वराज्याची स्थापना केली. लोकहित डोळ्यांसमोर ठेवून राज्यकारभार करण्याबरोबरच त्यांनी समता,बंधुता या मूल्यांची प्रतिष्ठापना केली.प्रजेच्या हितासाठी महाराजांनी स्वराज्यनिर्मितीबरोबरच सामाजिक परिवर्तनासाठी केलेले कार्य जगभरातील नागरिकांना प्रेरणादायी ठरले आहे.
महाराजांनी केलेले कार्य घराघरात पोहोचविण्याच्या हेतूने आम्ही मंडळाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित विविध ऐतिहासिक प्रसंग दरवर्षी सजीव देखाव्याच्या माध्यमातून सादर करून समाज प्रबोधनाचे कार्य करीत आहे. मागील वर्षी मंडळाने ‘अफजल खानाचा वध’ हा देखावा सादर केला होता आणि त्याला संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्धी मिळाली होती. यंदाच्या वर्षी छत्रपतींच्या शिवराज्याभिषेक दिनाला ३५० वर्ष पूर्ण झाली असून त्यानिमित्ताने आम्ही ‘श्री शिवराज्याभिषेक सोहळा ‘ या सजीव देखाव्याचे सादरीकरण केले आहे.



अध्यक्ष -किशोर शिंदे, कार्याध्यक्ष- संजय काळे,उपाध्यक्ष – नितीन कुंबरे, संघटक – धनंजय बलकवडे विशाल पालेकर, खजिनदार – श्रीकांत अमराळे सचिन साळुंके, चिटणीस – तुषार कंधारे रोहित मोकाटे, व्यवस्थापक- अमित ठोंबरे सचिन मोरे









