पुणे शहर

कर्वे रस्त्यावरील दशभुजा गणपती मंदिराजवळ रिक्षावर झाड कोसळून चौघे जखमी

पुणे: कोथरुडमधील कर्वे रस्त्यावरील दशभुजा गणपती मंदिराजवळ एका रिक्षावर झाड कोसळल्याने त्यात तिघे जण जखमी झाले. सुदैवाने रिक्षातील तिघांना किरकोळ जखमा झाल्या. अग्निशामक दलाच्या जवानांनी त्यांना बाहेर काढून ससून रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. ही घटना सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी घडली.

याबाबत अग्निशामक दलाकडून दिलेल्या माहितीनुसार, कोथरुड येथील दशभुजा मंदिराजवळील कॅनॉल रोडवरुन रिक्षा
जात होती. त्याचवेळी एक गुलमोहराचे झाड उन्मळून रिक्षावर पडले. त्याचवेळी तेथून एक दुचाकीही जात होती. दुचाकीचालक सुदैवाने वाचला. झाड रिक्षावर पडल्याने त्यातील प्रवासी आत अडकले होते.

अग्निशामक दलाला याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन झाडाच्या फांद्या बाजूला करुन आतील प्रवाशांची सुटका केली. त्यांना किरकोळ जखमा झाल्याने उपचारासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आले.

राज्य सरकारच्या अमृत संस्थेचा लाभ कुणाला मिळतो ? आपण नक्की अमृतचे लाभार्थी कसे होऊ शकतो ? आपल्या सर्व प्रश्नांच्या उत्तरासाठी विश्वजीत देशपांडे यांचा हा व्हिडीओ जरूर पहा ….
Img 20231005 wa00016479141591235684709
Img 20231006 wa00082205612602262147405
Img 20230717 wa0012281294517541507444836162
Img 20230511 wa0002282292294772633607891151
Img 20221228 wa000128229460950061152000874
Img 20230812 wa0001281292979418231884101793

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये