पुणे शहर
भाजप पुणे शहर चिटणीस व शहर कार्यालय सहप्रभारीपदी अमोल डांगे यांची निवड

पुणे : भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहर चिटणीस व शहर कार्यालय सहप्रभारीपदी अमोल डांगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या हस्ते डांगे यांना नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला.
अमोल डांगे गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे सक्रीय कार्यकर्ते आहेत. अभाविप पुणे शहर सहमंत्री, भाजप कोथरूड मतदारसंघ सरचिटणीस आणि भाजप पुणे शहर सह कार्यालयमंत्री अशा विविध पदांवर डांगे यांनी काम केले आहे.
अमोल डांगे म्हणाले, चंद्रकांत दादा पाटील आणि शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी मला दिलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करणार आहे.










