पेट्रोल पंपावर नागरिकांच्या रांगा पण…राज्यात पेट्रोल पंप बंदची अफवाच

पुणे : राज्यभरात उद्यापासून पेट्रोल पंप चालक संप करणार असून त्यामुळं पंप बंद राहणार असल्याची अफवा पसरली होती. त्यामुळं आपल्या वाहनांमध्ये इंधन भरुन घेण्यासाठी पंपावर ठिकठिकाणी मोठी गर्दी उसळली आहे.
यापार्श्वभूमीवर आता पेट्रोल-डिझेल असोसिशनं प्रेसनोट काढून स्पष्टीकरण दिलं आहे. संपाचा किंवा पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा संघटनेची कोणतीही योजना नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
राज्याच्या विविध भागात पसरलेल्या या अफवेमुळं पेट्रोल मिळणार नाही या भीतीनं पेट्रोल पंपवर वाहनांची एकच गर्दी झाली आहे.
आज सरकारच्या नवीन कायद्या विरोधात ट्रक चालकांच्या आंदोलनाचा परिणाम दिसून आला. नागपूरात शहरातील पेट्रोल पंपांवर दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी झुंबड झाल्याचं पाहायला मिळालं. एरव्ही पेट्रोल पंपावर दोन-चार वाहनं असताना आज मात्र पेट्रोल पंपावर एकच गर्दी पाहायला मिळत आहे.
ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशन प्रवक्ता अली दारूवाला यांनी सर्व पेट्रोल पंप खुले राहतील, असे स्पष्ट केले आहे.
संपूर्ण भारतातील वाहतूकदारांच्या संपाचा पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यावर परिणाम होणार नाही कारण जिल्हा प्रशासनाने लोणी डेपो,,,,, पेट्रोलियम पदार्थांच्या रिफिलिंगसाठी पेट्रोलियम टँकरना पोलिस संरक्षण दिले आहे….
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सर्व पेट्रोल पंप सुरू राहणार आहेत.










