कोथरूडमध्ये जाहिरात बाजीसाठी दुभाजकावर लावलेले धोकादायक लोखंडी रेलिंग पालिकेने हटवले.. सिंहासन News Impact

नेमका हा प्रकार केला कोणी पालिकेला अजून थांगपत्ता नाही
कोथरूड : कोथरूड मधील कर्वे पुतळा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक दरम्यान रस्त्याच्या मधोमध दुभाजकावर अज्ञातांकडून जाहिरातबाजीसाठी धोकादायकरित्या लोखंडी रेलिंग (बॅरगेट्स) अधांतरी बसवण्यात आले होते. सिंहासन न्यूजने याबाबत बातमी प्रसिद्ध केल्यानंतर खडबडून जागे झालेल्या महापालिकेच्या आकाश चिन्ह विभागाने कारवाई करत जाहिरात केलेले लोखंडी बॅरगेट्स अतिक्रमण विभागामार्फत ताब्यात घेतले आहेत. The municipality removed the dangerous iron railings placed on the divider for advertising in Kothrud. Sinhasan news Impact
हा विषय दुभाजकावर धोकादायक जाहिरात करण्यापुरता मर्यादित नसून या पाठीमागे फार मोठ गौडबंगाल असल्याचे दिसून येत आहे कारण दुभाजकावर हे लोखंडी बॅरगेट्स जाहिरातीसाठी कोणी ठेवले याचा शोध मात्र महापालिकेला अजून लागलेला नाही.

याबाबतीत कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयातील आकाश चिन्ह विभागाचे अधिकारी राजू ढाकणे यांनी सांगितले की, दुभाजकावर ठेवण्यात आलेले जाहिरात केलेल बॅरगेट्स अतिक्रमण विभागाने ताब्यात घेतलेले आहेत. यावर जाहिरात करणाऱ्या मराठी मॅट्रीमोनी या कंपनीला मेल करण्यात येणार असून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात येणार आहे. हा प्रकार नक्की कोणी केला हे अजून समजले नसल्याचे त्यांनी सांगितले.
दुभाजकावर ठेवण्यात आलेल्या बॅरगेट्सवर मराठी मॅट्रीमोनी या नामांकित कंपनीची जाहिरात करण्यात आली होती. अशी कंपनी सहज कोणालाही जाहिरात देणार नाही. एखाद्या नामांकित एजन्सी मार्फतच ते आपली जाहिरात प्रसिद्ध करत असणार मग पुण्यात अशा प्रकारे बेकायदा जाहिरात करणारे कोण आहेत आणि त्याचा पत्ता महापालिकेला का लागत नाही याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत.






दोन दिवसात संबधित कंपनीची लाखो रुपयांची जाहिरात दुभाजकावर झाली आहे, पण महापालिका आता किती दंड वसूल करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
मुळात धोकादायकरित्या दुभाजकावर अधांतरी बॅरगेट्स लावून त्यावर जाहिरात बाजी करण्यात आली होती मात्र हा प्रकार नक्की कोणी केला आहे हे महापालिकेच्या आकाश चिन्ह विभागाच्याच अधिकाऱ्यांना माहीत नसल्याचे समोर आल्याने पालिकेचा अजब कारभार पुढे आल्याने एकच चर्चा झाली.



हा प्रकार नक्की कोणी केला हे पालिका प्रशासनाला अजून कळाले नसल्याने या दुभाजकावर ठेवण्यात आलेले हे रेलिंग धक्का लागून रस्त्यावरून पडून अपघात घडला असता तर प्रशासनाने कोणाला जबाबदार धरले असते. आकाश चिन्ह विभागाचा बेजबाबदारपणा कोणाच्या जीवावर बेतला असता म्हणजे प्रशासनाला जाग आली असती का असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. ज्या कोणी हा प्रकार केला आहे त्याने एक प्रकारे महापालिकेची फसवणूक केली आहे, त्यामुळे त्यांच्यावर महापालिका गुन्हा दाखल करणार का हे आता पाहावे लागणार आहे.






