पुणे शहर

पवित्र ईदच्या पार्श्वभूमीवर कोंढव्यात ‘ईद ए मिलाद’ कार्यक्रमाचे आयोजन

पुणे : पुणे शहरातील मुस्लीम समाजाच्यावतीने कौसरबाग, कोंढवा येथे राज्याचे मा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘ईद ए मिलाद’ कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.  उपमुख्यमंत्री पवार यांनी सर्व उपस्थितांना ईद च्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी अजित पवार यांनी हिंदू, मुस्लीम, शीख, ईसाई,जैन सर्व धर्मीयांनी एकोप्याने रहावे, असा संदेश दिला. तसेच राज्य शासनाकडून अल्पसंख्याक समाजास विविध योजनामार्फत भरीव निधीची तरतूद कटीबद्ध आहे, असा विश्वास व्यक्त केला. शासनाच्या विविध योजना, संकल्पनामुळे  विद्यार्थी, तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक अशा घटकांपर्यंत पोहचवून समाजाचा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकास  होणार आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर म्हणाले, “देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी देशाला प्रगतीपथावर नेऊन ठेवले आहे. त्यांच्या केंद्रातील सरकारने वेळोवेळी मुस्लिम समाजाच्या भल्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. तसेच येत्या लोकसभा निवडणुकीत ‘महायुती’च्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करून मुस्लिम समाज मा. मोदीजींच्या पाठीशी खंबीरपणे आहे हे दाखवून द्यावे, त्यासाठी पुणे लोकसभा मतदारसंघ मुरलीधर मोहोळ, बारामती लोकसभा सौ. सुनेत्रावहिनी पवार, शिरूर लोकसभा मतदारसंघ शिवाजीराव आढळराव पाटील आणि मावळ लोकसभा मतदारसंघ श्रीरंग बारणे हे निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले. 

या कार्यक्रमाला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार चेतन तुपे, कारी इद्रिस साहेब, इद्रिस नायकवडी बाबा सिद्धीकी, नजीब मुल्ला, पी. ए. इनामदार, वसीम बुऱ्हान, मौलाना अन्वर साहेब, गफुर पठाण, वनराज आंदेकर, हाजी फिरोज, रईस सुंडके, नंदा लोणकर,परवीन शेख, हसिना इनामदार, समीर अन्सार शेख, अब्दुल हाफिज, अल्ताफ मर्चंड, रौफ कुरेशी यांच्यासह पुण्यातील व कोंढवा भागातील सर्वधर्मीय नागरिक उपस्थित होते.

Img 20240404 wa00195661228638643442239
Img 20240404 wa00154462680026350583661
Img 20240404 wa00142311409567432001146

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये