‘श्रीमंत दगडूशेठ’ गणपती मंदिरात अतिरुद्र महायागाला प्रारंभ

पुणे : रुद्र होम, महा सुदर्शन होम, संतान गोपाल कृष्ण होम यांसह विष्णू सहस्त्रनाम अर्चना, गणेश याग, मेधा दक्षिणा मूर्ती होम, स्वयंवर पार्वती होमासह विविध प्रकारच्या धार्मिक विधींनी एकवीस दिवसीय अतिरुद्र महायागाला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातआज प्रारंभ झाला.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळा तर्फे अतिरुद्र महायाग मंदिरात करण्यात येत आहे. वेदमूर्ती नटराजशास्त्री आणि६५ ब्रह्मवृंद होम, विधीमध्ये सहभागी आहेत. मंगळवार, दिनांक २३ जुलैपर्यंत दररोज दुपारी धार्मिक विधी होतील.

गंगा, यमुना, इंद्रायणी, पंचगंगा, मुठा, अष्टविनायक येथील नद्या, ज्योर्तिलिंग नद्या, रामेश्वरम २१ कुंडांचे जल याकाळात वापरले जात आहे. तसेच २१ आयुर्वेदिक औषधी वापर होम-हवनाच्या वेळी करण्यात येत आहे. सर्व नद्यांच्या एकत्रित केलेल्या मंत्रोच्चारीत पाण्याचा श्रींना जलाभिषेक करण्यात येत आहे.









