आई वडिलांचे छत्र हरपलेल्या अडीच वर्षाच्या आर्यनचं किरण दगडे पाटील यांनी स्वीकारलं शैक्षणिक पालकत्व..
भोर : एक वर्षाचा असताना आईचे छत्र हरपले तर वयाच्या २ वर्षी वडिलांचे अपघाती निधन झाले. अवघ्या दोन वर्षात घडलेल्या या दुःखद घटनांनी आर्यन पोरका झाला. आजीकडे राहणाऱ्या आर्यनच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला. अशा या अडचणीच्या क्षणी आर्यनचा आधार बनत माजी नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी त्याचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारत त्याच्या पुढील सर्व शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे.
आर्यन एक वर्षाचा असताना त्याच्या आईचा आकस्मिक मृत्यू झाला. लहानग लेकरू आईच्या मायेला पोरक झालं. यानंतर त्याचे वडील विलास कोंढाळकर हे त्याचा संभाळ करत होते. आई नसलेल्या लेकराची आई अन् बाप दोन्ही भूमिका विलास हेच पार पाडत होते. आईला जाऊन वर्ष उलटत नाही तोच आणखी एक काळा दिवस उजाडला. विलास कोंढाळकर रात्री कामावरून घरी येत असताना त्यांचा अपघात झाला अन् यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आधीच आईला पोरक झालेलं लेकरू आता बाप नावाच्या आभाळाला देखील
पोरक झालं.
ही बातमी किरण दगडे पाटील यांना कळाली एकूणच परिस्थिती लक्षात घेऊन आर्यनसाठी काय करता येईल याबाबत सारखी त्यांच्या मनात चलबिचल सुरू होती. त्यांनी सरळ भोर तालुक्यातील पान्हवळ गावातील आर्यन राहत असलेलं आजीचं घर गाठल अन् सर्व परिस्थिती जाणून घेतली. किरण दगडे पाटील यांनी कुटुंबाला मानसिक आधार दिलाच पण आर्यन ची यापुढील सर्व शैक्षणिक जबाबदारी आपण स्वीकारली आहे. आयुष्यात त्याच्या सर्व सुख दुःखात त्याची सोबत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल. आर्यनला उत्तम दर्जाचं शिक्षण मिळेल, तो सुजाण नागरिक बनेल यासाठी त्याच्या पाठी मागे भक्कमपणे उभा राहील हा शब्द त्याच्या कुटुंबीयांना दिला. यावेळी अप्पासाहेब चोंधे, रोहन भोसले उपस्थित होते.
किरण दगडे पाटील म्हणाले, रंजल्या गांजल्यांची सेवा करण्याचा धर्म आपली संस्कृती शिकवते हाच धर्म पाळताना मनाला कमालीचं समाधान लाभल. आर्यनच उज्वल भविष्य घडो यासाठीच माझा प्रयत्न असणार आहे.