कर्वेनगरमध्ये नूतनीकरण केलेल्या बॅडमिंटन कोर्टचे सुप्रिया सुळे यांच्या हस्ते लोकार्पण..
कोथरूड : कोथरूड मतदार संघातील प्रभाग क्र. ३१ कर्वेनगरमधील जावळकर वस्ती जवळ असणाऱ्या पुणे मनपाच्या नूतनीकरण केलेल्या बॅडमिंटन कोर्टचा लोकार्पण सोहळा खासादर सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पार पडला. या बॅडमिंटन कोर्टची अवस्था दयनीय झाल्याने खेळाडूंना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत होता. कोथरूड मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)अध्यक्ष स्वप्नील दुधाने यांनी महापालिकेकडे याबाबत पाठपुरावा करून बॅडमिंटन कोर्टचे नूतनीकरण करून घेतले. आजपासून हे कोर्ट पुन्हा उपलब्ध झाल्याने स्थानिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी नगरसेवक सचिन दोडके आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काका चव्हाण, माजी नगरसेविका लक्ष्मी दुधाने आदी या वेळी उपस्थित होते. यावेळी मान्यवर व्यक्तींच्या हस्ते देशी वृक्षाची लागवड करत वृक्षारोपणही करण्यात आले.
यावेळी सुप्रिया सुळे यांनी महिला खेळाडूंबरोबर बॅडमिंटन खेळण्याचा आनंद लुटला व उपस्थित खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रभागात राबविण्यात येणाऱ्या क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षक आणि राष्ट्रीय, राज्यस्तरीय खेळाडू आणि पुणे मनपाचे अधिकारी यांचा सुळे यांच्या हस्ते या प्रसंगी सन्मान करण्यात आला. स्वप्नील दुधाने हे सर्व क्षेत्रातील लोकांसाठी करत असलेल्या कामांबाबत सुळे यांनी त्यांचे कौतुक केले.
स्वप्नील दुधाने म्हणाले, तब्बल ४० लाख रुपये खर्च करून नूतनीकरण केलेल्या या प्रकल्पामुळे भविष्यात अनेक उत्तमोत्तम खेळाडू या ठिकाणी घडतील, आपल्या कोथरूड आणि पर्यायाने पुणे शहराचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास वाटतो.
विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या पुण्यनगरीमध्ये आज अनेक खेळाडू घडत असून ही पुणेकर म्हणून नक्कीच आनंददायी गोष्ट आहे. या खेळाडूंना प्रोत्साहन देणे आणि त्यांना उत्तमोत्तम सुविधा उपलब्ध करणे ही लोकप्रतिनिधी म्हणून आपली जबाबदारी आहे, या अनुषंगाने ही विकासकामे सत्यात उतरवण्यात आली. यामध्ये नवीन वुडन फ्लोअर, उष्णता रोधक पत्रे, आकर्षक रंगकाम, स्वच्छता, नेट, विद्युत विषयक कामे आणि अन्य सुविधांचा समावेश आहे.
याप्रसंगी शहराचे युवकाध्यक्ष किशोर कांबळे, कोथरूड विधानसभेच्या महिला अध्यक्ष ज्योती सूर्यवंशी, कोथरूड विधानसभेचे कार्याध्यक्ष जयेश मुरकुटे, कोथरूड विधानसभेचे युवकाध्यक्ष गिरीशजी गुरनानी, माजी युवकाध्यक्ष प्रमोद शिंदे, राजेंद्रजी उभे, वैभव कोठूळे, प्रियंका तांबे, मीनल सुर्वे, देवेंद्र सूर्यवंशी, दीपक चांदगुडे, विनायक देशमुख, विनोद हनवते तसेच अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, खेळाडू, नागरिक व संजीवनी ज्येष्ठ नागरिक संघाचे सभासद उपस्थित होते. वि. दा पिंगळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.