वारजेतील प्रलंबित प्रकल्पांना मिळणार निधी ; बाबा धुमाळ

अजित पवारांच्या सूचनेनुसार पालिकेत आयुक्तांबरोबर झाली बैठक
वारजे : गेली काही वर्ष पुरेसा निधी मिळत नसल्याने नागरिकांसाठी आवश्यक असणारे वारजेतील काही प्रकल्प पूर्ण होऊ शकलेले नाहीत परंतु वारजेतील या प्रलंबित प्रकल्पांना आता निधी मिळणार आहे. नुकतीच माजी नगरसेवक बाबा धुमाळ यांची महापालिका आयुक्त राजेश भोसले यांच्याबरोबर बैठक झाली. या बैठकीत वारजेमधील प्रकल्पांना निधी देण्यास आयुक्तांनी सहमती दर्शवली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वारजे मधील प्रलंबित कामांना गती मिळावी यासाठी संबधित अधिकाऱ्यांबरोबर बरोबर बैठकीचे आयोजन करून दिले होते तसेच संबधित कामांना निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. त्यानुसार महापालिका आयुक्त राजेश भोसले, माजी नगरसेवक बाबा धुमाळ, विविध विभागाचे प्रमुख यांची महापालिकेत बैठक पार पडली.

यावेळी बाबा धुमाळ यांनी मिनी नाट्यगृह, क्रीडा संकुल, डीपी रस्ता, सर्व्हिस रस्ता, ड्रेनेज लाईन, पावसाळी लाईन या कामांना निधी उपलब्ध करून देण्यात यावा तसेच महापालिका शिक्षण विभागातील सेवकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यात यावेत अशी आयुक्तांकडे मागणी केली.
बाबा धुमाळ म्हणाले, वारजेतील मिनी नाट्यगृह, कल्चरल सेंटर तसेच क्रीडा संकुलासारखे मोठे प्रकल्प प्रशासकीय काळात निधी अभावी रखडलेले आहेत. हे प्रकल्प स्थानिक नागरिकांसाठी व खेळाडूंसाठी पूर्ण होणे आवश्यक आहे. या बरोबरच नागरी सुविधांची कामे ही निधी नसल्याने थांबलेली आहेत. बैठकीत रखडलेल्या कामांना निधी उपलब्ध करून देण्याबाबत आयुक्तांनी सकारत्मकता दर्शवली आहे.












