पुणे शहर

शूरवीर जिवाजी महाले जयंती सोहळा संपन्न

पुणे :  शिवरायांचे अंगरक्षक रणमर्द जिवाजी महाले यांच्या ३८५ व्या जयंतीनिमित्त बारा बलुतेदार समाज विकास संघाच्यावतीने व सकल नाभिक समाजाच्यावतीने,पुणे शहराच्यावतीने त्यांच्या रास्ता पेठ येथील पुतळ्यास पुष्पहार नगरसेवक योगेश समेळ यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष रामदास सूर्यवंशी हे होते. यावेळी पुणे शहराध्यक्ष राजेश भोसले,पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष हेमंत श्रीखंडे,प्रदिप वाळुंजकर,प्रसिध्दीप्रमुख प्रशांत गायकवाड,सिंहगड रोड अध्यक्ष निलेश चातुर,नाभिक अध्यक्ष बाबासाहेब भामरे,कसबा अध्यक्ष विनायक गायकवाड,पर्वती अध्यक्ष सूर्यकांत भोसले,शिवसैनिक गणेश दैठणकर,दत्ता पंडित,पि चि नाभिक समन्वयक गणेश वाळुंजकर आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

7

सूत्रसंचालन प्रशांत गायकवाड,स्वागत राजेश भोसले तर आभार हेमंत श्रीखंडे यांनी मानले.१० वृक्ष दत्तक घेण्याची घोषणा यावेळी करण्यात आली.त्याप्रमाणे वृक्ष दत्तक देण्यात आले.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये