वारजे येथे महामार्गावर रस्ता ओलांडताना ट्रकने उडवल्याने एकाचा मृत्यू

वारजे : वारजे येथे मुंबई बेंगलोर महामार्गावर रस्ता ओलांडत असताना ट्रकने उडवल्यांने एका पदाचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवार दिनांक ११ जुलै २०२३ रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार वारजे माळवाडी येथे महामार्गावरून चांदणी चौकाकडून कात्रजकडे वेगाने जाणाऱ्या टी एन ५२ ए ए ९८७६ या क्रमांकाच्या ट्रकने अतुल नगर जवळ रस्ता ओलांडणाऱ्या एकाला जोरात धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर वारजे पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
बाबासाहेब देवराम उदावंत (वय -५५, रा. फ्लॅट नंबर 502, चक्रधर सोसायटी मानाजीनगर नऱ्हे. वडगाव पुणे) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. अपघात घडताच वारजे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर व सहाय्यक पोलिस निरीक्षक बापू रायकर पथकासह घटनास्थळी दाखल झाले होते. अपघातातील जखमी व्यक्तीस तातडीने रुग्णवाहिका बोलावून रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी जखमीस मृत घोषित केले.







