एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित; सोबत आणखी कोण प्रवेश करणार याची उत्सुकता

विनायक बेदरकर : सिंहासन NEWS
मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली होती. पण, आता एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश हा निश्चित मानला जात आहे. लवकरच राष्ट्रवादीकडून खडसे यांच्या पक्षप्रवेशाबद्दल अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे गेल्या अनेक दिवसांपासून पक्षावर नाराज आहे. अलीकडे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये निवड न झाल्यामुळे खडसे कमालीचे दुखावले गेले होते. त्यामुळे एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली होती.
मात्र, आता एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित मानला जात आहे. लवकरच खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून याबद्दल अधिकृत घोषणा केली जाणार आहे. राष्ट्रवादीत प्रवेशानंतर एकनाथ खडसे यांच्यावर पक्ष संघटनेत मोठी जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याची माहिती आहे.
एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांच्यासोबत कोण-कोण भाजप नेते राष्ट्रवादीमध्ये येणार याची उत्सुकता लागली आहे. खडसे यांच्या प्रवेशामुळे उत्तर महाराष्ट्र मधील अनेक नेते राष्ट्रवादीमध्ये दाखल होण्याचे संकेत मिळत आहे.




