पुणे शहर अर्बन सेलच्या वतीने मतदानाबाबत जनजागृती..

पुणे : मतदान हा संविधानाने दिलेला सर्वोच्च अधिकार असून याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी पुणे अर्बन सेलने संदेश देणाऱ्या फलकांच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधत मतदान करण्याबाबत जनजागृती केली.
राजकीय घटनांमुळे नागरिकांचा निवडणूक आणि मतदान याकडे पाहण्याचा दृष्टिकोन दूषित बनत चालला आहे. मतदानाचा अधिकार हा लोकशाहीत महत्वाचा आहे. मतदानाचा हक्क बजावणे हे आपले कर्तव्य असून याबद्दल अर्बन सेल पुणेच्या पदाधिकाऱ्यांनी जनजागृती केली. पौड फाटा येथे रस्त्याच्या कडेला मतदान जनजागृतीचे फलक घेऊन मतदानाचे कर्तव्य बजवण्याबाबत संदेश देण्यात आला.
यावेळी वाहतूक पोलिसांचे विशेष सहकार्य मिळाले. सदर उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले. मतदानाची टक्केवारी वाढावी याकरता या उपक्रमाचे पुणे शहर अर्बन सेलच्या कोथरूड विधानसभेच्या वतीने आयोजन करण्यात आले होते व त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे अर्बन सेलचे शहराध्यक्ष स्वप्नील दुधाने यांनी सांगितले.
कोथरूड विधानसभा अर्बन सेलचे अध्यक्ष सचिन यादव व त्यांच्या सहकाऱ्यांनी आयोजित केलेल्या या उपक्रमात अर्बन सेलचे सर्व पदाधिकारी व सदस्य सहभागी झाले होते.










