पुणे शहर, जिल्हा

आगामी काळात या कामांवर जास्त आमदार निधी वापरणार : भीमराव तापकीर

शेवटच्या टप्प्यातील प्रचार ;  नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे, खडकवासला : भारतीय जनता पक्ष, महायुतीचे खडकवासला मतदार संघाचे उमेदवार भिमराव तापकीर यांनी आज धनकवडी भागातील प्रचार दौऱ्यात आपल्या आगामी विकास योजनांबाबत महत्वाचे विधान केले. “पुढील पाच वर्षांत खडकवासला मतदारसंघातील सहकारी गृहनिर्माण संस्था, मोठ्या सोसायट्या आणि ग्रामीण भागाच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आमदार निधी मोठ्या प्रमाणावर वापरणार आहे,” असे तापकीर यांनी जाहीर केले.

Img 20241020 wa0001435697684176070576

त्यांच्या प्रचारा दरम्यान केशव कॉम्प्लेक्स, पंचरत्न, राजमुद्रा, ओंकार पार्क, राघव नगर, श्री मंगल, नर्सेस टाऊन, गणेश नगर, सह्याद्री नगर, आदर्श नगर, संभाजीनगर, वनराई कॉलनी, रामचंद्र नगर, ज्योती पार्क या भागांना भेट देऊन त्यांनी येथील स्थानिक नागरिकांशी संवाद साधला आणि आपल्या कामगिरीचा आढावा दिला.

गेल्या पाच वर्षांत 19,031 कोटी रुपयांचे प्रकल्प खडकवासला मतदारसंघात आणण्यात यशस्वी झाल्याचा उल्लेख करताना, त्यांनी महत्त्वाचे प्रकल्प उदा. मेट्रो प्रकल्प, पश्चिम रिंग रोड, चांदणी चौक उड्डाणपूल, आणि जलसंपदा सुधारणा यांसारख्या उपक्रमांचे यशस्वी नेतृत्व कसे केले हे सांगितले.

Img 20240404 wa0016281297658999536660438617

सिंहगड किल्ल्याच्या जतन आणि संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर, ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांसाठी विशेष निधी आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी, नागरी आणि ग्रामीण भागांसाठी रस्ते, पाणीपुरवठा, वीज, आणि आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा, सोसायट्यांच्या सोलर प्रकल्पांसाठी विशेष निधी उपलब्ध, पुणे महानगरपालिकेत समाविष्ट 32 गावांमधील मालमत्ता कराचा प्रश्न सोडवण्यासाठी यशस्वी प्रयत्न केल्याचे तापकीर यांनी सांगितले.

प्रचार दौऱ्यात मा.नगरसेविका वर्षा तापकीर, माजी नगरसेविका अश्विनी भागवत, मोहिनी देवकर, आप्पासाहेब धावणे, संतोष फरांदे, विश्वास आहेर, युवराज रेणूसे, अभिषेक तापकीर, सचिन बदक, सागर साबळे, आनंद शिंदे, दत्ता सावंत, अंकुश सोनवले, महेश भोसले, सत्यवान कामठे, सतिश घाटे, उल्हास खुटवड,दादा देवकर, पांडुरंग भोसले, अंकुश कोकाटे आणि महायुतीचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.

Img 20240404 wa0013281298602993728148316202

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये