कोथरूड ऑनलाईन नोकरी महोत्सवाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

भाजयुमो कोथरुड मतदार संघाचे अध्यक्ष दुष्यंत मोहोळ यांच्या वतीने आयोजन
बारावी ते पदवीधर युवक-युवतींना संधी.
कोथरुड : कष्ट करण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाच्या हाताला काम करण्याची संधी देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा, कोथरूड विधानसभाच्या वतीने ‘कोथरूड ऑनलाईन नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या संबंधित संकेतस्थळाचे (वेबसाईट)अनावरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
भारतीय जनता युवा मोर्चा कोथरुड मतदार संघाचे अध्यक्ष दुष्यंत मोहोळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या ऑनलाईन नोकरी महोत्सवा अंतर्गत युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे, या ‘ऑनलाईन कोथरूड नोकरी महोत्सव’ च्या संकेतस्थळ (वेबसाईट) चे अनावरण प्रसंगी कोथरुड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, युवा मोर्चा सरचिटणीस निलेश सोनवने तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
दुष्यंत मोहोळ म्हणाले की, ‘कोरोनाच्या संकट काळात लाॅकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक घडी विस्कटलेली आहे. अनेक तरुण तरुणींना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. तरुणांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी व त्यांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी या ऑनलाईन कोथरूड नोकरी महोत्सवाचे आयोजन केले आहे.
इच्छुक युवक-युवतींनी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन आपल्या क्षेत्रातील नोकरीची माहीती घेऊन आपला बायोडाटा अपलोड करवा व या संधीचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे आवाहन मोहोळ यांनी केले.
https://www.vinsys.com/career.



