महाराष्ट्र

पुणे पदवीधर मतदार नोंदणीतील त्रुटी दूर करा ; चंद्रकांत पाटील यांची मागणी

मुंबई : पुणे विधानपरिषद पदवीधर मतदार संघातील मतदारांची यादी तयार करण्याच्या ऑनलाईन प्रक्रियेतील त्रुटी दूर कराव्यात अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.

या संदर्भात पाटील यांनी गुरुवारी मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे  या निवेदनात पाटील यांनी म्हटले आहे की, पदवीधर मतदारसंघाच्या मतदार ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेत अनेक त्रुटी आहेत. या त्रुटी दूर न करताच निवडणूक घेण्याची तयारी सुरू आहे. या बाबीकडे राज्य निवडणूक आयोगाचे लक्ष यापूर्वीच वेधण्यात आले होते.

ऑनलाईन भरलेले अर्ज नाकारले जाणे अशा अनेक तक्रारी मतदारांनी केल्या आहेत. त्याच बरोबर सर्व्हर यंत्रणा काम करत नसल्यानेही या प्रक्रियेत अनेक अडचणी येत असल्याने ऑफलाईन अर्ज भरण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.  भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चैनसुख संचेती हे पाटील यांच्या समवेत उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये