आ. चंद्रकांत पाटील यांच्याकडून कोथरुडमध्ये पोस्ट कोविड आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

२५० पेक्षा जास्त नागरिकांची आरोग्य आणि तर १५० जणांची मोफत रक्त तपासणी
कोथरुड : कोरोनावर ज्यांनी यशस्वीपणे मात केली आहे; मात्र, ज्यांना अजूनही आरोग्याच्या तक्रारी आहेत, अशांसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून कोथरुडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मोफत पोस्ट कोविड आरोग्य तपासणी व रक्त तपासणी शिबिराला कोथरुडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात २५० पेक्षा जास्त नागरिकांची आरोग्य तपासणी तर १५० पेक्षा जास्त जणांची रक्त तपासणी करण्यात आली.

गेल्या काही दिवसांत पुण्यामध्ये कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण दिवसागणिक वाढते आहे. मात्र, कोरोनावर ज्यांनी यशस्वीपणे मात केली आहे; यापैकी बऱ्याचजणांना आरोग्याच्या तक्रारी आहेत. त्यांच्या आरोग्याच्या तक्रारी नष्ट व्हाव्यात यासाठी पाटील यांच्या माध्यमातून आज कोथरुडमधील महेश विद्यालय येथे या शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.



या शिबीरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार, मोफत आरोग्य तपासणी आणि रक्त तपासणी करण्यात आली. तसेच आणि मानसोपचार तज्ज्ञांकडूनही मार्गदर्शन करण्यात आली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रॅन्डम शुगर टेस्ट, हिमोग्राम, सीआरपी, डी-डायमर आदीच्या तपासण्या देखील केल्या गेल्या. या शिबिराला कोथरुडकरांनी चांगला प्रतिसाद देत, आपली आरोग्य तपासणी करुन घेतली.
या शिबिरात डॉ. अजित डेंगळे, डॉ. नितीन पाटील, डॉ. सुमित अगरवाल, डॉ. संजय गांधी, डॉ. नितीन धांडे, डॉ. प्रशांत बोरुडे, समुपदेशक अभय ठकार सारख्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांची तपासणी करण्यात आली, दरम्यान, आज सकाळी या शिबिराला आमदार चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन, सर्व तज्ज्ञ डॉक्टरांना सन्मान चिन्ह देऊन गौरविले. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह कोथरुड मधील सर्व नगरसेवक आणि भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.



