सिलिंडर बुकींग, व्याजदर, रेल्वे वेळापत्रक यात होणार उद्यापासून बदल

नवी दिल्ली – सिलिंडर बुकींग, व्याजदर, रेल्वे वेळापत्रक अशा सामान्य माणसाच्या जीवनातील नियमांमध्ये येत्या ०१ नोव्हेंबर पासून बदल होणार आहेत.

एलपीजी सिलिंडर वितरणातील बदल असे असतील. ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर गॅस वितरणापूर्वी ओटीपी पाठविला जाईल. सिलिंडर जेव्हा आपल्या घरी येईल त्यावेळी डिलिव्हरी बॉयबरोबर ओटीपी शेअर करावा लागेल. ओटीपी नंबर जुळल्यावरच गॅस सिलिंडर दिला जाणार आहे. इंडेन गॅस च्या ग्राहकांना एलपीजी सिलिंडर बुक करण्यासाठी ७७१८९५५५५५ वर कॉल किंवा एसएमएस पाठवावा लागेल.



भारतीय रेल्वेचे गाड्यांचे वेळापत्रकही ०१नोव्हेंबर पासून बदलले जाणार आहे. रेल्वेकडे १३ हजार प्रवासी गाड्या आणि ०७ हजार माल वाहतूक गाड्या असून त्या सगळ्यांचेच वेळापत्रक बदलले जाणार आहे.
बचत खात्यावर एक लाख रुपयांपर्यंत ०.२५ टक्के व्याजदर कमी करुन ३.२५ टक्के केला जाईल. एक लाखाहून अधिक रकमांच्या ठेवीवर रेपो रेटनुसार बदल केला जाणार आहे. या सर्व बदलांचा परिणाम सामान्य ग्राहकांच्या खिशावर होणार आहे.



