महाराष्ट्र

मराठा क्रांती मोर्चा आता पुणे पदवीधर निवडणूकीची लढाई लढणार

पुणे पदवीधर मतदारसंघ मराठा समाजाची निवडणूक लढवण्या संदर्भात ऑनलाईन बैठक संपन्न

पुणे : पदवीधर मतदार संघ निवडणूक मराठा क्रांती मोर्चा च्या माध्यमातून मराठा समाजाच्या मागण्या अधोरेखीत करण्‍यासाठी व मराठा समाजातील शैक्षणिक व नोकर यांचे प्रश्न उपस्थित करण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात ठामपणे उतरणार आहे.

Img 20201024 wa0166 1

यासाठी ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये तालूका बेस पकडून मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांच पुनर्बांधणी करण्याच्या विषयावर एकमत झाले . त्या पद्धतीने प्रत्येक तालूका पातळीवर बेस  मजुबुत करणे व बैठका घेण्याच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या.

मराठा क्रांती मोर्चा मध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकाने आपला आवाज बुलंद करण्यासाठी पदवीधर मतदार संघातील मतदारांपर्यंत पोहोचायचे आहे.
या मध्ये पदवीधर तसेच पदवी नसलेल्या तरुणांनी सहभागी होऊन उमेदवाराचा प्रचार करणे .

Img 20201028 wa0145

आपल्या तालुक्यातील समन्वयकांच्या भेटी घेणे व त्यांना मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवली जाणार आहे याची माहिती देणे.

तसेच पदवीधर मतदारांची नोंदणी करण्यासाठी प्रयत्न करणे व नोंदणी झालेल्या मतदारांची ची माहिती कार्यालयाला देणे.

एक मराठा किमान 10 मतदारांपर्यंत पोहोचेल असे नियोजन करणे.

मराठा समाजातील सुशिक्षित बेरोजगार तसेच पदवीधर विद्यार्थ्यांच्या या प्रश्नासाठी ही निवडणूक महत्त्वपूर्ण आहे.
पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये पक्षीय राजकारण नको तर मराठा हक्काचा प्रश्न मांडला जावा यासाठी आपला एक प्रयत्न महत्त्वाचा ठरणार आहे.

दिवाळी पर्यंत किमान 100000 मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी यामध्ये सहभागी व्हावे यासाठी आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयक यांच्याकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये