महाराष्ट्र

महाराष्ट्र कॉग्रेस प्रदेशाध्यक्षपदी या नेत्याची निवड निश्चित ?

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकांनंतर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. विद्यमान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या जागी महाविकास आघाडी सरकारमधील दुसऱ्या मंत्र्याची वर्णी निश्चित मानली जात आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते आणि पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांच्या खांद्यावर ही जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.

राहुल गांधी यांच्या खांद्यावर जानेवारी महिन्यात काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाण्याचे संकेत आहेत. त्याआधीच सुनील केदार यांची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागण्याची चिन्हं आहेत. राहुल गांधी यांच्या नवीन टीममध्ये युवकांना प्राध्यान्य देण्यात येणार आहे. सुनील केदार यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले यांची नावंही शर्यतीत असल्याचे बोलले जाते.

Img 20201024 wa0163
Img 20201028 wa0145

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना ऑगस्ट महिन्यात 23 नेत्यांनी पक्षाच्या पुनर्रचनेबाबत पत्र पाठवले होते. त्यावरुन काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे चित्र होते. “काँग्रेस नेते मुकुल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण आणि मिलिंद देवरा यांनी गांधी घराणाच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करणे लज्जास्पद आहे” अशी टीका सुनील केदार यांनी केली होती

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये