राष्ट्रीय

सोनू सूद याने मुलींना सायकली भेट दिल्या

मुंबई : अभिनेता सोनू सूद आता अनेकांना आधार वाटू लागला आहे. रिअल लाईफ हिरो बनला आहे. स्थलांतरीत मजुरांना भरभरून मदत करून देशभरातून प्रशंसा मिळविली.

अलिकडे उत्तर प्रदेशातील ट्विटर युजर्सने सोनू सूदला टॅग करून मदत मागितली. सोनभद्रा आणि मिर्झापूर येथील ३५मुलींसाठी मदत मागितली. गांवातील या मुलींना दररोज आठ ते पंधरा किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. जंगलातून मुलींना पायपीट करावी लागते. त्यांना सायकली दिल्या तर त्यांच्या भविष्याचा प्रवास सुखकर होईल असे ट्विटर युजर्सने म्हटले होते.

Img 20201024 wa0166 1

या आवाहनाला सोनू सूदने प्रतिसाद दिला. नव्या कोऱ्या सायकली गांवात मुलींपर्यंत पोहोचविल्या. सायकल ऑफ लाईफ अशा शब्दात सोनू सूदच्या मदतीचे वर्णन एका ट्विटर युजरने केले.

Img 20201028 wa0145

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये