पुणे शहर, जिल्हा

पुणेकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा देण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी घेतला महत्त्वाचा निर्णय…

पुणे : पुणे शहरातील वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी मोटार वाहन कायदा, १९८८ मधील कलम ११५ अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत जड, अवजड व मल्टी अॅक्सल वाहनांच्या प्रवेशावर तात्पुरती बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत.

Fb img 17803875442192531368419001118856



या आदेशानुसार दि. १५ जून २०२६ रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते दि. २४ जून २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत पुणे शहरातून इतर शहरांकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना शहरात प्रवेश करता येणार नाही. संबंधित वाहनांसाठी सोलापूर, मुंबई, अहिल्यानगर, सासवड, चाकण, शिक्रापूर, तळेगाव, जेजुरी, सुपे आदी मार्गांद्वारे पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.

शहरात माल उतरविणे अथवा माल भरून इतरत्र जाणे आवश्यक असलेल्या तसेच अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या वाहनांनी वाहतूक शाखा, पुणे शहर यांची ७२ तास अगोदर परवानगी घेऊन रात्री ११ ते सकाळी ६ वाजेदरम्यान निर्धारित पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान, पेट्रोल, डिझेल, दूध, शेतीमाल आदी अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या वाहनांना या बंदी आदेशातून वगळण्यात आले आहे. नागरिकांनी व वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून वाहतूक व्यवस्थेस सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी केले आहे.

Img 20251125 wa01783213374507166536090

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये