कोथरूड आणि कर्वेनगर परिसरात उद्या(बुधवारी) पाणीपुरवठा बंद राहणार…

पुणे : नवीन ५०० दशलक्ष प्रतिदिन क्षमतेच्या पर्वती जलशुद्धीकरण येथील एस. एन. डी. डी. एम. एल. आर. झोनच्या डिलेव्हरी साईडच्या स्ल्युस वॉल्व्ह विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम करणेत येणार आहे त्यासाठी बुधवार दि.०५/०८/२०२६ रोजी सदर झोनच्या पंपिंगवर अवलंबून असणाऱ्या खालील भागाचा पाणीपुरवठा दुपारी २ ते सायंकाळी ७ पर्यंत बंद राहणार आहे. तसेच गुरुवार दिनांक ०६/०८/२०२६ रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. अशी माहिती पुणे महापालिका प्रशासनाने दिली आहे.
पाणीपुरवठा बंद असणारा भाग :-
१. एस. एन. डी. डी. (एम. एल. आर.): लॉ कॉलेज रोड, पौड रोड, शीला विहार कॉलनी, अद्वैत सोसा.भीमनगर, वेदांतनगरी, कुलश्री कॉलनी परिसर, सहवास, क्षिप्रा, मनोहन सोसा. विठ्ठल मंदिर परिसर, गोसावी वस्ती परिसर,

करिष्मा सोसायटी समोरील परिसर, बीग बाझार परिसर, बंधन सोसायटी परिसर, डी. पी. रस्ता (पार्ट), मयुर कॉलनी परिसर,मयुर डी. पी. रस्त्याची डावी बाजु, कर्वेरोड झाला सोसायटी ते शिवाजी पुतळ्या पर्यंतचा भाग, एरंडवणा परिसर, दशभूजा गणपती ते नळस्टॉप, सहकार वसाहत म्हात्रे पुलापर्यंत एच. ए. कॉलनी टिळेकर प्लॉट, भरतनगर अर्चनानगर, भरतकुंज,स्वप्नमंदीर परिसर, सुनिता सोसायटी, युको बँक कॉलनी, टँकर पॉईट, डि. पी. रस्ता मंगेशकर हॉस्पिटल, हिमाली सोसायटी, वकिलनगर, करिष्मा सोसायटी ते वारजेवार्ड ऑफिस, गिरीजा शंकर, नवसह्याद्री सोसायटी, ताथवडे उद्यान परिसर, निलकमल, युनायटेड वेस्टर्न, अनुरेखा स्थैर्य, मधूचय, शैलेश, अलंकार, मनिषा, स्वस्तिश्री, रघुकुल महिम्न, सुखा जयशक्ती, सोसायटी परिसर.
–
२. चतु:श्रृंगी टाकी परीसर औंध, बोपोडी, भोईटे वस्ती, पुणे विद्यापीठ परिसर, चिखल वाडी, खडकी, आनंद पार्क, सानेवाडी, आंबेडकर वसाहत, संकल्प पार्क, सकाळनगर, चव्हाणनगर, अभिमानश्री सोसायटी, नॅशनल, सिंघ सोसायटी, औंधगाव परिसर.



