पुणे शहर, जिल्हा

उद्यापासून बावधनमध्ये विठुनामाचा गजर..कीर्तन महोत्सवात नामवंत कीर्तनकारांचा असणार सहभाग..

भजन स्पर्धा, भजन जुगलबंदीचे ही आयोजन

पुणे : उद्यापासून पासून पुढील आठ दिवस म्हणजे  शुक्रवार दि. 2 ऑक्टोबर ते शुक्रवार दि. 9 ऑक्टोबर 2026 पर्यंत बावधन बुद्रुक आणि परिसर विठुनामाच्या भक्तीरसात न्हाऊन निघणार आहे. कै. ज्ञानोबा बाबुराव दगडे पाटील (मुकादम) यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून आठ दिवस चालणाऱ्या या सप्ताहात नामवंत कीर्तनकारांच्या श्रवणीय कीर्तनातून विठुनामाचा गजर व संतांच्या विचारातून सामाजिक प्रबोधन होणार आहे.

बापूसाहेब ज्ञानोबा दगडे पाटील मुकादम यांनी वडील कै. ज्ञानोबा बाबुराव दगडे पाटील यांच्या आठवणीत व द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त या कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे. मागील वर्षी प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त घेण्यात आलेला कीर्तन महोत्सव उत्तम नियोजनाने आणि कीर्तनकारांच्या संत वाणीने संस्मरणीय ठरला होता. तसेच नियोजन द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त ही करण्यात आलेले आहे. 

Img 20260222 wa0006893553232066122087

शुक्रवार दि. 2  ऑक्टोबर ते  शुक्रवार दि 9 ऑक्टोबर 2026 पर्यंत असणारा हा कीर्तन महोत्सव रोज सायंकाळी 6.30 ते 8.30 या वेळेत बावधन बुद्रुक येथील तलाठी ऑफिस समोरील मैदानावर आयोजित करण्यात आलेला आहे. वडिलांच्या स्मरणार्थ घेण्यात येत असलेल्या या कीर्तन सोहळ्याने महाराष्ट्रात एक वेगळे स्थान निर्माण केलेले आहे.

या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवशी  शुक्रवार 2 ऑक्टोबर भागवताचार्य ह.भ.प. सोपान महाराज सानप (हिंगोली) यांचे कीर्तन होणार आहे. शनिवार दिनांक 3 ऑक्टोंबर प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर), रविवार दिनांक 4 ऑक्टोबर वारकरी भूषण ह.भ.प. उमेश महाराज दशरथे (देवाची आळंदी), सोमवार दिनांक 5 ऑक्टोबर युवक भूषण ह.भ.प. जगन्नाथ महाराज पाटील (मुंबई), मंगळवार दिनांक 6 ऑक्टोबर किर्तन केसरी ह.भ.प. अक्रूर महाराज साखरे (बीड), बुधवार 7 ऑक्टोबर भागवताचार्य ह.भ.प. विशाल महाराज खोले, गुरुवार दिनांक 8 ऑक्टोबर ह.भ.प. अनंत महाराज काळे संगमनेर (पुण्यस्मरण निमित्त) अशी किर्तन सेवा असणारा असून शुक्रवार दिनांक 9 ऑक्टोबर रोजी आवाजाचे जादूगार ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील(बुलढाणा) यांचे काल्याचे किर्तन होणार आहे.

या कीर्तन महोत्सवाबरोबरच गुरुवार दिनांक 8 ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता मुळशी, मावळ व हवेली तालुक्यातील भजनी मंडळासाठी घेण्यात आलेली भजन स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेबरोबर याच दिवशी रात्री 8.30 वाजता म्हणजे कीर्तन सेवा झाल्यानंतर भजन जुगलबंदीचे आयोजन करण्यात आलेले आहे या जुगलबंदी मध्येअभिनव गंधर्व पंडित रघुनाथजी खंडाळकर (गुरूजी), पंडित शंकरराव वैरागकर (सर),पंडित बाळासाहेब वाईकर (सर), संगीत अलंकार सौ. गायत्रीताई  गायकवाड-गुल्हाणे, पंडित केशवजी जगदाळे (गुरूजी), तबला अलंकार पांडुरंग पवार (गुरूजी) सहभाग घेणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये