पुणे शहर

स्वच्छता आणि कामगार चळवळीतील योगदानाची दखल; कॉ. वैजीनाथ गायकवाड यांचा ‘आदर्श महाराष्ट्र गौरव’ पुरस्काराने सन्मान

पुणे : स्वच्छता जनजागृती, सामाजिक कार्य आणि कामगार चळवळीतील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त) चे संयुक्त सचिव तथा कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाचे स्वच्छता ब्रँड अँबेसिडर, मोकादम कॉ. वैजीनाथ गायकवाड यांना राज्यस्तरीय ‘आदर्श महाराष्ट्र गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.

Img 20261029 wa00153082406691295416280

कोथरूड भागात स्वच्छतेविषयी विविध उपक्रम राबविणे, नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करणे तसेच कामगार चळवळ आणि सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत राहिल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जिद्द, चिकाटी, कर्तव्यनिष्ठा आणि सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात एक आदर्श निर्माण केला आहे.

राष्ट्रभक्ती परिवार, युनायटेड सिटीझन्स अँड वेल्फेअर कौन्सिल, भारत ग्रेट पीपल सोशल फाउंडेशन आणि विजेता मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सदाशिव पेठ येथील भारत इतिहास संशोधन मंडळाच्या राजवाडे सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. महेश थोरवे आणि युनायटेड सिटीझन्स अँड वेल्फेअर कौन्सिलच्या राष्ट्रीय अध्यक्षा भारतीताई तुपे यांच्या हस्ते कॉ. वैजीनाथ गायकवाड यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, ट्रॉफी, मेडल, विशेष सन्मानपत्र आणि तिरंगा ध्वज असे होते.

Fb img 1793342454540


कॉ. वैजीनाथ गायकवाड यांच्या यापूर्वीच्या कार्याचीही विविध स्तरांवर दखल घेण्यात आली आहे. त्यांना पुणे महानगरपालिकेचा ‘गुणवंत कामगार पुरस्कार’, ‘स्वच्छ भारत अभियान’ व ‘स्वच्छ सर्वेक्षण’ अंतर्गत दोन वेळा स्वच्छता पुरस्कार, ‘स्वच्छता मित्र पुरस्कार’, ‘कर्तव्यनिष्ठ पुरस्कार’ तसेच ‘कर्तव्य तत्पर कामगार कार्यकर्ता पुरस्कार’ मिळाले आहेत.

पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉ. महेश थोरवे आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षा भारती तुपे यांनी पुरस्कारार्थींनी आपल्या-आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत समाजाला नवी दिशा द्यावी, आदर्श नागरिक आणि आदर्श भारत घडविण्यासाठी योगदान द्यावे, तसेच भारतमातेची सेवा करावी, असे आवाहन केले.

कॉ. वैजीनाथ गायकवाड यांच्या या सन्मानाबद्दल कामगार, सामाजिक आणि स्वच्छता क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Img 20261031 wa0125
Img 20261031 wa0190
Fb img 17931033768477166369956517137623

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये