डॉ .नीलमताई आपण बराेबरच बाेललात…चंद्रकांतदादा आपण कोथरूडमधील विजयाचे कधी तरी आत्मचिंतन करा…

पुणे: विधानसभा निवडणुकीमध्ये जर शिवसेना काेथरुड मध्ये चंद्रकांत पाटील यांच्या बराेबर नसती तर परत त्यांना काेल्हापुरला जावे लागल असते. हे नक्कीच , ज्या तळमळीने शिवसैनिकांनी चंद्रकात पाटील यांना निवडून येण्यासाठी प्रयत्न केले.याची तरी जाण त्यांना असावी . असा टोला शिवसेना उपशहरप्रमुख किरण साळी यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.
साळी म्हणाले,विधानसभा निवणुकीपूर्वी सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत गिरीष बापट यांना कोथरूड मतदारसंघांमध्ये 1,10,000 मतांचे लीड मिळाले होते.मात्र चंद्रकांत दादा आपणास केवळ पंचवीस हजाराचे मताधिक्य मिळाले.याला कारण तुमच्या भाजपचे नेते आणि कार्यकर्ते आपल्या विरोधात काम करत होते.मात्र युतीतील शिवसेना पक्षातील शिवसेना नेते शशिकांत सुतार, नीलम गोऱ्हे, चंद्रकांत मोकाटे, शाम देशपांडे आणि आम्ही शिवसैनिक खांद्याला खांदा लावून प्रचार करत होते.

याचाच परिणाम म्हणून सर्व पुणेकरांचा विरोध असतानाही आपण निवडून आला मला आठवते निवडणूक जाहीर झाल्यानंतर दादा तुम्ही कोथरूड मधून निवडणुकीचा अर्ज भरला आणि निवडणुकीमध्ये मला मदत करा म्हणून आपण नीलम ताईंच्या घराचे उंबरठे झिजवले हे तुम्ही विसरलात.



नीलमताई यांनी स्वता: भर पावसात प्रचार फेरी केली , अगदी मतदानाचा दिवशी एरंडवणा, काेथरुड, शास्त्री नगर, संवेदनशील मतदान केंद्रावर स्वत: गेलात युतीचा कार्यकर्तांना त्यामुळे उर्जा मिळाली . आणि चंद्रकांत पाटिल हे २०-२५ हजार मतांनी निवडुन आले. काेथरुड हा शिवसेनेचा बाल्लेकिल्ला क़ायम राहिला आहे. आणि यापुढेही राहील.चंद्रकांतदादा आपण कोथरूडमधील विजयाचे कधी तरी नक्की आत्मचिंतन करा… आणि हो तुमच्या पक्षातील नासक्या कांद्याना आवरा. साळी यांनी म्हटलं आहे.






















































