पुणे शहर

उजळली वंचितांची दिवाळी

राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडूूून दिवाळी फराळ वाटप

पुणे : परिस्थितीने पदपथावर राहणाऱ्या आणि पोटाची खळगी भरण्यासाठी शिकण्या खेळण्याच्या सिग्नलवर फुले आणि वस्तू मुलांना दिवाळीचा आनंद मिळावा याउद्देशाने राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहराचे सरचिटणीस गिरीश गुरनानी यांनी दिवाळी फराळ वाटप हा उपक्रम राबविला.

या उपक्रमामुळे नळस्टॉप, डेक्कन आणि करिश्मा चौकात पदपथ सिग्नलवर राहणाऱ्या मुलामुलींचा आनंद गगनात मावेनासा झाला.याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहराचे सरचिटणीस गिरीश गुरनानी, प्रीतम पायगुडे, अमोल गायकवाड, संदेश कोतकर, रवी गाडे, सौरभ ससाणे आदी उपस्थित होते.

रस्त्यावरील चौकात झालेल्या या उपक्रमाने पदपथावर राहणाऱ्या मुलामुलींची भाऊबीजेची संध्याकाळ सुखद झाली. मनसोक्त फराळाचा आस्वाद घेताना मुले भारावून गेली होती, असे गिरीश गुरनानी म्हणाले.दिवाळी सणाचा आनंदापासून परिस्थितीमूळे वंचित राहून खडतर जीवन जगणाऱ्या या मुलांना दिवाळीचा आनंद देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम केला, असे मत गिरीश गुरनानी यांनी व्यक्त केले.

Img 20201114 wa0195
Whatsapp image 2020 11 13 at 2. 39. 13 pm
Img 20201118 wa0057

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये