पुण्यातील खासगी शाळांनी ऑनलाईन शिक्षण केले बंद

पुणे : सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पुणे आणि पिंपरीमधील जवळपास 1 हजार 400 खासगी शाळांनी ऑनलाईन शिक्षण बंद केले आहेत. आजपासून गुरुवारपर्यंत म्हणजे तीन दिवस हे ऑनलाईन शिक्षणाचे वर्ग बंद ठेवण्याचा निर्णय फेडरेशन ऑफ स्कुल्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांनी घेतला आहे.कोरोना आणि लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांचे पालक शाळांचे शुल्क भरु शकले नाहीत. त्यामुळे अनेक शाळा आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत.
अशा परिस्थितीत पुण्यातील खासगी इंग्रजी शाळांचे ऑनलाईन शिक्षण 3 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फेडरेशन ऑफ स्कुल्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांनी पुणे आणि पिंपरीतील शाळांबाबत हा निर्णय घेतला आहे.

कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. कुणाचा पगार अर्धा झाला. त्यामुळे अनेक पालक आपल्या पाल्याचे शैक्षणिक शुल्क भरु शकले नाहीत. त्यामुळे शाळांचंही मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. शिक्षकांचे पगार देण्यासही शाळांकडे पैसा नाही. अशा स्थितीत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पुणे आणि पिंपरीमधील जवळपास 1 हजार 400 खासगी शाळांनी ऑनलाईन शिक्षण बंद केले आहेत. आजपासून गुरुवारपर्यंत म्हणजे तीन दिवस हे ऑनलाईन शिक्षणाचे वर्ग बंद ठेवण्याचा निर्णय फेडरेशन ऑफ स्कुल्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांनी घेतला आहे. राज्य सरकारने याकडे लक्ष देण्याची मागणी फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्र सिंह यांनी केली आहे.



पालक आक्रमक
कोरोनाच्या काळात शाळा बंद करण्यात आलेल्या असून, शाळांनी पालकांकडे फीचा तगादा लावला आहे. पुण्यात फी न भरल्यास ऑनलाईन शिक्षण बंद केलं जाणार आहे. यासंदर्भात पालिकेच्या शिक्षण मंडळात शनिवारी सुनावणी पार पडली. शिक्षण संचालकांसमोर पालकांनी शाळांविरोधातल्या तक्रारींचा पाढा वाचला. पालकांनी फी कमी करण्याची मागणी केली असून, शाळा 100 टक्के फी वसुलीवर ठाम असल्याचंही समोर आलं आहे. त्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे. शिक्षण संचालकांच्या सुनावणीत पालक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत.



